शनिवार, २९ ऑगस्ट, २००९

फक्त तुझ्यासाठी...


पापण्या आड़ दडलेले प्रेम तुझे


कधी नकळत डोळ्यात दाटते


तू सांगण्याची गरज नसते


ते पहिल्यावरती कलते

न सांगता सारे काही

वाटते तुला.... मला सारे कलावे

जबाब्दारिचे ओझे वाटते...

तूझायकडेच वलावे

तू नको बोलूस काही

मला सारे काही कलते

पण तुज्याविना जीवन नाही

तरी हे सांगावेसे वाटते....

शनिवार, ८ ऑगस्ट, २००९

शुन्य....



नित्याचेच दुःख होते उशागति बसलेले


त्याच्या रेंगाल्त्या स्वरी मन होते फसलेले


फसलेल्या मनी होती एक पोकळी विशाल


दुरवर मात्र कुठे होती जरा हालचाल


तोच अवचित आले सुख ठोठावित दार


परी फसलेले मन आणि माथ्यावरी भार


कड़ी काढिता उशिरा दुरवर पाठमोरे ....


सुख दिसे चालताना; शुन्य मात्र आता उरे!

मी एकाकी ....


' तुझा ' आणि ' तुझ्यासाठी, शब्द सारे खोटे

खरी फक्त क्वचित कधी बिलागनारी बोटे



बिलागनारी बोटे तीही बिलगून सुद्धा दूर

खोल खोल भुयारात कहनारे सुर



दूरदूर ओसाडित भटकनारे पाय

त्वचेमागील एकाकीपण कधी सरते काय



-- शांता शेलके

मंगळवार, १४ जुलै, २००९

आयुष्य ... अजुन काय...

वेदना देई जगन्यास अर्थ; दुख देई मना सामर्थ्य

आजवर जे भोगले तू ते कधी ही ना ठरणार व्यर्थ

अन्न्याच्या गर्द अंधाराला जावे परी भेदुनी

शोधू दिशा आता नव्या डोळ्यात स्वप्न हे गूणी

बुधवार, ८ जुलै, २००९

प्रेम.... एक हवाहवासा अनुभव


दाटून आलेल्या संध्याकाली अवचित सोनेरी ऊन पडत


तसाच काहीसे पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येत


शोधून कधी सापडत नाही मागुन कधीच मिळत नाही


वादल वेड घुसत तेव्हा टालू म्हणून टलत नाही


आकाश पानी तारे वारे सारे सारे ताजे वाटतात


वर्षांच्या वीट्लेल्या बधिर मनाला आवेंगांचे तूरे फुलतात


संभ्रम, स्वपन, सांत्वन, तलमल, किती किती तरह असतात


साऱ्या साऱ्या जीवघेण्या आणि खोल जीव्हारी ठसतात


प्रेमाच्या सफल वीफलतेला खरतर काही महत्व नसत


इथल्या पराजयातही एक गहिरे सार्थक असत


पण ते भोगायला एक उसलनार मन लागत


खुल्या सोनेरी उन्हासारखे आयुष्यात प्रेम यावे लागत


शनिवार, ४ जुलै, २००९

पाउस.... एक वेगला अनुभव



पावसात रमत गमत चालायच असतं


वेळाने उठायचं अन मग


चहा चहा म्हणत घर डोक्यावर घ्यायचं असतं


पावसात रमत गमत चालायच असत..........


कपडे ख़राब होतात असं


आई कितीही ओरडली


तरी पांढऱ्या कपडयानाच प्राधान्य द्यायच असत


पावसात रमत गमत चालायच असतं.........


कॉलेजला जाताना नेमकी छत्री विसरायची असते


दादा द्यायला आला तरी आपण लपायाचं असतं


पावसात रमत गमत चालायच असतं...........


छोट्या छोट्या नावा करून पाण्यात सोडायच्या असतात


दिसेनाश्या होईपर्यंत न्याहलायाच असतं


पावसात रमत गमत चालायच असतं ............


आडोश्याला उभ राहून देखील चिंब चिंब भिजायचं असतं


पाय घसरला नहीं तरी चिखलात पडायचं असतं


पावसात रमत गमत चालायचं असतं ..........

मैत्री ...


क्षण क्षण वाटताना
क्षण क्षण वाटतानादोघांची साथ असते

अंधार दूर करण्या साठी

दिव्यातिल ती वात असते ......

येनारया क्षणाना कोणाचीही परवा नसते

क्षण कसा सावरावा
हीच तर दोघांची कसोटी असते .....

मी कसाही वागलो तिच्याशी तरी ती माजी वाट बघत असते

रागावून जाताना ती मला आवाज दीईलाच याची मला आस असते .......

माझ्यातला 'मी'


असेनही जरी मी , रस्त्याच्या कडेस निर्जीव थिजलेला...

काळाकुटट, ओबडधोबड, दगड एकाकी निजलेला !

पण, लाभला जर एखादा चुकार पावसाळी स्पर्श,तर दिसेल तुम्हाला...

माझ्याही खाली, एक हिरवा ओला अंकुर अलगद रुजलेला!


मी कोरडा, भगभगीत,उन्हाच्या रापाने भाजलेला...

चिडका, तापट, भेसूर, माझ्याच व्यापाने झिजलेला !

पण कधी आलीच एखादी, हळवी गार झुळूक,तर दिसेल तुम्हाला...

एके काळी, विरहवेळी, पाऊसही माझ्या अश्रूत भिजलेला !

मी पापपुण्याच्या अध्यात्माला सदैव बुजलेला...


नास्तिकतेच्या रोगाने, नको इतका सुजलेला !

पण निनादली जर घंटा दूर कुठे राऊळी,तर दिसेल तुम्हाला..

मनाच्या गाभाऱ्यात, मी ही देव गुपचूप पुजलेला !


मी रांगडा, निर्लज्ज म्हणून सांप्रत गाजलेला...

बेबंध वळू, सराईत कोडगेपणाने माजलेला!

पण फिरलेच कधी मोरपीस गालावरून,तर दिसेल तुम्हाला...

तिच्या एकाच कटाक्षाने, मी कधी लाल होऊन लाजलेला !

आज जरी मी कित्येक बदलांनी सजलेला...

जगाने हजार मापे लावून हवा तसा मोजलेला!

पण मागे वळून पहिलेच कधी,तर दिसेल तुम्हाला...

जिवंत म्हणून पेटताना...माझ्यातला 'मी' कधीच विझलेला...!!


गुरुवार, २ जुलै, २००९


मला पक्के ठाउक आहे की


प्रत्येक गोष्टीला अंत आहे


म्हणुन मी काही बोलत नाही


मी अगदी शांत आहे


शुक्रवार, ८ मे, २००९