
नित्याचेच दुःख होते उशागति बसलेले
त्याच्या रेंगाल्त्या स्वरी मन होते फसलेले
फसलेल्या मनी होती एक पोकळी विशाल
दुरवर मात्र कुठे होती जरा हालचाल
तोच अवचित आले सुख ठोठावित दार
परी फसलेले मन आणि माथ्यावरी भार
कड़ी काढिता उशिरा दुरवर पाठमोरे ....
सुख दिसे चालताना; शुन्य मात्र आता उरे!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा