
दाटून आलेल्या संध्याकाली अवचित सोनेरी ऊन पडत
तसाच काहीसे पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येत
शोधून कधी सापडत नाही मागुन कधीच मिळत नाही
वादल वेड घुसत तेव्हा टालू म्हणून टलत नाही
आकाश पानी तारे वारे सारे सारे ताजे वाटतात
वर्षांच्या वीट्लेल्या बधिर मनाला आवेंगांचे तूरे फुलतात
संभ्रम, स्वपन, सांत्वन, तलमल, किती किती तरह असतात
साऱ्या साऱ्या जीवघेण्या आणि खोल जीव्हारी ठसतात
प्रेमाच्या सफल वीफलतेला खरतर काही महत्व नसत
इथल्या पराजयातही एक गहिरे सार्थक असत
पण ते भोगायला एक उसलनार मन लागत
खुल्या सोनेरी उन्हासारखे आयुष्यात प्रेम यावे लागत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा