मंगळवार, १४ जुलै, २००९
आयुष्य ... अजुन काय...
आजवर जे भोगले तू ते कधी ही ना ठरणार व्यर्थ
अन्न्याच्या गर्द अंधाराला जावे परी भेदुनी
शोधू दिशा आता नव्या डोळ्यात स्वप्न हे गूणी
बुधवार, ८ जुलै, २००९
प्रेम.... एक हवाहवासा अनुभव

दाटून आलेल्या संध्याकाली अवचित सोनेरी ऊन पडत
तसाच काहीसे पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येत
शोधून कधी सापडत नाही मागुन कधीच मिळत नाही
वादल वेड घुसत तेव्हा टालू म्हणून टलत नाही
आकाश पानी तारे वारे सारे सारे ताजे वाटतात
वर्षांच्या वीट्लेल्या बधिर मनाला आवेंगांचे तूरे फुलतात
संभ्रम, स्वपन, सांत्वन, तलमल, किती किती तरह असतात
साऱ्या साऱ्या जीवघेण्या आणि खोल जीव्हारी ठसतात
प्रेमाच्या सफल वीफलतेला खरतर काही महत्व नसत
इथल्या पराजयातही एक गहिरे सार्थक असत
पण ते भोगायला एक उसलनार मन लागत
खुल्या सोनेरी उन्हासारखे आयुष्यात प्रेम यावे लागत
शनिवार, ४ जुलै, २००९
पाउस.... एक वेगला अनुभव

पावसात रमत गमत चालायच असतं
वेळाने उठायचं अन मग
चहा चहा म्हणत घर डोक्यावर घ्यायचं असतं
पावसात रमत गमत चालायच असत..........
कपडे ख़राब होतात असं
आई कितीही ओरडली
तरी पांढऱ्या कपडयानाच प्राधान्य द्यायच असत
पावसात रमत गमत चालायच असतं.........
कॉलेजला जाताना नेमकी छत्री विसरायची असते
दादा द्यायला आला तरी आपण लपायाचं असतं
पावसात रमत गमत चालायच असतं...........
छोट्या छोट्या नावा करून पाण्यात सोडायच्या असतात
दिसेनाश्या होईपर्यंत न्याहलायाच असतं
पावसात रमत गमत चालायच असतं ............
आडोश्याला उभ राहून देखील चिंब चिंब भिजायचं असतं
पाय घसरला नहीं तरी चिखलात पडायचं असतं
पावसात रमत गमत चालायचं असतं ..........

