शनिवार, ४ जुलै, २००९

पाउस.... एक वेगला अनुभव



पावसात रमत गमत चालायच असतं


वेळाने उठायचं अन मग


चहा चहा म्हणत घर डोक्यावर घ्यायचं असतं


पावसात रमत गमत चालायच असत..........


कपडे ख़राब होतात असं


आई कितीही ओरडली


तरी पांढऱ्या कपडयानाच प्राधान्य द्यायच असत


पावसात रमत गमत चालायच असतं.........


कॉलेजला जाताना नेमकी छत्री विसरायची असते


दादा द्यायला आला तरी आपण लपायाचं असतं


पावसात रमत गमत चालायच असतं...........


छोट्या छोट्या नावा करून पाण्यात सोडायच्या असतात


दिसेनाश्या होईपर्यंत न्याहलायाच असतं


पावसात रमत गमत चालायच असतं ............


आडोश्याला उभ राहून देखील चिंब चिंब भिजायचं असतं


पाय घसरला नहीं तरी चिखलात पडायचं असतं


पावसात रमत गमत चालायचं असतं ..........

मैत्री ...


क्षण क्षण वाटताना
क्षण क्षण वाटतानादोघांची साथ असते

अंधार दूर करण्या साठी

दिव्यातिल ती वात असते ......

येनारया क्षणाना कोणाचीही परवा नसते

क्षण कसा सावरावा
हीच तर दोघांची कसोटी असते .....

मी कसाही वागलो तिच्याशी तरी ती माजी वाट बघत असते

रागावून जाताना ती मला आवाज दीईलाच याची मला आस असते .......

माझ्यातला 'मी'


असेनही जरी मी , रस्त्याच्या कडेस निर्जीव थिजलेला...

काळाकुटट, ओबडधोबड, दगड एकाकी निजलेला !

पण, लाभला जर एखादा चुकार पावसाळी स्पर्श,तर दिसेल तुम्हाला...

माझ्याही खाली, एक हिरवा ओला अंकुर अलगद रुजलेला!


मी कोरडा, भगभगीत,उन्हाच्या रापाने भाजलेला...

चिडका, तापट, भेसूर, माझ्याच व्यापाने झिजलेला !

पण कधी आलीच एखादी, हळवी गार झुळूक,तर दिसेल तुम्हाला...

एके काळी, विरहवेळी, पाऊसही माझ्या अश्रूत भिजलेला !

मी पापपुण्याच्या अध्यात्माला सदैव बुजलेला...


नास्तिकतेच्या रोगाने, नको इतका सुजलेला !

पण निनादली जर घंटा दूर कुठे राऊळी,तर दिसेल तुम्हाला..

मनाच्या गाभाऱ्यात, मी ही देव गुपचूप पुजलेला !


मी रांगडा, निर्लज्ज म्हणून सांप्रत गाजलेला...

बेबंध वळू, सराईत कोडगेपणाने माजलेला!

पण फिरलेच कधी मोरपीस गालावरून,तर दिसेल तुम्हाला...

तिच्या एकाच कटाक्षाने, मी कधी लाल होऊन लाजलेला !

आज जरी मी कित्येक बदलांनी सजलेला...

जगाने हजार मापे लावून हवा तसा मोजलेला!

पण मागे वळून पहिलेच कधी,तर दिसेल तुम्हाला...

जिवंत म्हणून पेटताना...माझ्यातला 'मी' कधीच विझलेला...!!


गुरुवार, २ जुलै, २००९


मला पक्के ठाउक आहे की


प्रत्येक गोष्टीला अंत आहे


म्हणुन मी काही बोलत नाही


मी अगदी शांत आहे


शुक्रवार, ८ मे, २००९

बुधवार, ६ मे, २००९